उस्मान हादी हत्या प्रकरण : बांगलादेश तोंडघशी, मारेकरी भारतात नाही तर 'यादेशात' सापडला
उस्मान हादी हत्या प्रकरण : बांगलादेश तोंडघशी, मारेकरी भारतात नाही तर 'यादेशात' सापडला
img
वैष्णवी सांगळे
बांगलादेशातील जुलै क्रांतीचे प्रमुख तरुण नेते शरीफ उस्मान हादी याची हत्या झाली , त्यांनतर बांगलादेशातील हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. हादी यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता पसरली. उस्मान हादी याची हत्या झाली होती. त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. भारतानेच हे कृत्य केल्याचे आरोप बांग्लादेशकडून होत होते. बांगलादेश सरकारही हादीचे मारेकरी भारतात पळून गेल्याचा दावा करत होते. मात्र आता बांगलादेश तोंडघशी पडला आहे.

पोलीस तपासात मसूदचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्यानंतर तो दुबईत असल्याचे समोर आले आहे. संशयित मारेकऱ्याने दुबईतून व्हिडीओ पोस्ट करून बांगलादेशला तोंडघशी पाडले आहे. उस्मान  हादी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी फैसल करीम मसूद याने दुबईतून मौन सोडले आहे. या हत्याकांडाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

मसूदने म्हटले आहे की, "माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. उस्मान हादी याच्या हत्येशी किंवा त्या कटाशी माझा कोणताही संबंध नाही. मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे." तो पुढे म्हणाला की, तो कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे, परंतु त्याला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे. हादी आणि माझे व्यावसायिक संबंध होते, असेही त्याने स्पष्ट केले आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group