बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन , वाचा कोणाकोणाचा समावेश?
बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन , वाचा कोणाकोणाचा समावेश?
img
Dipali Ghadwaje
बांगलादेशमध्ये आज नवीन अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस आणि इतर सदस्यांना बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बांगलादेशात १७ वर्षांनंतर अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशवर लागोपाठ १५ वर्षे राज्य केले. पण हिंसक आंदोलनानंतर अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून जावे लागले.

आता डॉ. युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्यात आले आहे. अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी संघटनांनी केली होती. विद्यार्थ्यांनी सर्व राजकीय पक्षांना अल्टिमेटम दिला होता की, ते दुसऱ्या कुणालाही प्रमुख बनवणार नाहीत. दुपारी परदेशातून आले आणि पत्रकारासोबत बोलताना त्यांना अश्रू ही अनावर झाले. डॉ. युनूस यांच्यासोबत अंतरिम सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या इतर सल्लागारांची नावे निश्चित करण्यात आली.

कोणत्या नावांचा समावेश आहे

प्रोफेसर मुहम्मद युनूस – मुख्य सल्लागार सय्यदा रिझवाना हसन – BELA च्या मुख्य कार्यकारी फरीदा अख्तर – महिला हक्क कार्यकर्त्या आदिलुर रहमान खान – अधिकारचे संस्थापक हिफाजत-ए-इस्लामचे एएफएम खालिद हुसेन नायब-ए-अमीर आणि इस्लामिक मूव्हमेंट बांगलादेशचे सल्लागार नूरजहाँ बेगम – ग्रामीण दूरसंचार विश्वस्त शर्मीन मुर्शिद – स्वातंत्र्यसैनिक सुप्रदीप चकमा – अध्यक्ष सीएचटीडीबी

युनूस यांच्याशिवाय अन्य १३ सदस्यांनी घेतली शपथ

मोहम्मद युनूस व्यतिरिक्त, अंतरिम सरकारमध्ये सालेह उद्दीन अहमद, डॉ. आसिफ नजरुल, आदिलुर रहमान खान, हसन आरिफ, तौहीद हसन, सईदा रिझवाना हसन, फरीदा अख्तर, खालिद हुसेन, विद्यार्थी नेते नाहीद इस्लाम आणि आसिफ मेहमूद, शाखावत हुसेन, सरपोदीप यांचा समावेश आहे. चकमा, बिधान रंजन, नूरजहाँ बेगम, शर्मीन मुशीद आणि फारुख ए आझम यांचाही समावेश असेल.

यापैकी सर्पदीप चकमा, बिधान रंजन रॉय आणि फारुख ए आझम वगळता उर्वरित १३ सदस्यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. उर्वरित तीन सदस्यांना नंतर शपथ दिली जाईल.

अंतरिम सरकारचे सल्लागार नागरी समाज आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमधून निवडले जातील आणि त्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा समावेश नसेल, असे सूत्रांनी सांगितले. अंतरिम सरकारच्या आकाराविषयी विचारले असता, लष्करप्रमुख जनरल वॉकर-उझ-झमान म्हणाले की सुरुवातीला सुमारे 15 सदस्य असू शकतात. आणखी एक किंवा दोन लोक जोडले जाऊ शकतात.” अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार पंतप्रधानांच्या बरोबरीचे असतात आणि इतर सल्लागार मंत्र्यांच्या बरोबरीचे असतात.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group