बांगलादेशला आयसीसीचा मोठा झटका, इशारा देत सांगितले, भारतात खेळा अन्यथा...
बांगलादेशला आयसीसीचा मोठा झटका, इशारा देत सांगितले, भारतात खेळा अन्यथा...
img
वैष्णवी सांगळे
भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला असताना दोन्ही देशांमधील क्रिकेटविश्वात देखील तणाव वाढला आहे. आगामी टी-20 विश्वचषकावर याचे सावट फिरत आहे. टी-20 विश्वचषकातील भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयसीसीकडे केली होती. मात्र बांगलादेशची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.



आगामी पुरुष टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी बांगलादेशच्या भारत दौऱ्याबाबत काल आयसीसी आणि बीसीबी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आयसीसीने बीसीबीला सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशचे सामने भारताबाहेर खेळवण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात येत आहे. बांगलादेशला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात प्रवास करावा लागेल, अन्यथा त्यांना गुण गमवावे लागतील, असा इशाराही आयसीसीने दिला आहे. दरम्यान, ७ फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

आयसीसीने भारतात सामने खेळावी लागतील असे  स्पष्ट केले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड श्रीलंकेत सामने घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. भारताने बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा थयथयाट बघायला मिळतोय. बीसीसीआयच्या सांगण्यावरून आयपीएल संघ केकेआरने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला करारमुक्त केले.

केकेआरने आयपीएल संघात मुस्तफिझुर रहमान याला घेतले होते. मात्र, होणारा विरोध आणि बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयानंतर मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हेच नाही तर केकेआरसह शाहरूख खान याच्यावरही जोरदार टीका मुस्तफिझुर रहमान याला घेतल्यानंतर करण्यात आली. त्यानंतर टी-20 विश्वचषकही खेळण्यासाठी आम्ही भारतात येणार नसल्याची भूमिका बांगलादेशने घेतली. मात्र, मोठा झटका आयसीसीने बांगलादेशला दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group