२ ऑक्टोबरपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिका सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयची वरिष्ठ निवड समितीने २५ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या कसोटी सामन्यात शुभमन गिल हा कर्णधार असणार आहे तर रवींद्र जडेजा हा उपकर्णधार असणार आहे.
देवदत्त पडिक्कलची भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र करुण नायर आणि आकाशदीप यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंग्लंड मालिकेत करुण नायर अपयशी ठरला होता. यष्टीरक्षक ऋषभ पंत अजूनही पूर्णपणे फिट नसल्याने त्यांच्या जागी नारायण जगदीशनला संधी देण्यात आली आहे. तसेच अक्षर पटेलनेही कसोटी संघात पुनरागमन केले आहे.
वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी २ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर दुसरी कसोटी १० ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल.