टीम इंडियाला मोठा धक्का;
टीम इंडियाला मोठा धक्का; "हा" स्टार खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार
img
दैनिक भ्रमर

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के. एल. राहुल राजकोट कसोटीतून बाहेर पडला आहे.

राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये १५ पासून राजकोट येथे मालिकेतला तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. राहुलऐवजी निवड समितीने कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल याचा संघात समावेश केला आहे.


भारतीय संघ आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताने १-१ अशी बरोबरी केली आहे. पहिल्या सामन्यात खेळताना राहुलला दुखापत झाली होती. राहुलच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली होती. राहुल अद्याप पायाच्या दुखण्यातून सावरलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात निवड समितीने त्याला आराम देत त्याच्याऐवजी देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. याद्वारे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.


त्याचबरोबर दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. तर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं संघात पुनरागमन झालं आहे. परंतु, बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की जडेजा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्यांचा अंतिम ११ जणांच्या संघात समावेश केला जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group