नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकचे माजी रणजीपटू रमेश वैद्य यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
रमेश वैद्य हे अनेक वर्ष नाशिकचे कर्णधार होते. ते भारताचे कसोटीवीर सुनील गावस्कर यांच्यासह अनेक भारतीय कसोटीपटूंबरोबर ते खेळले आहेत. सध्या ते मुंबईत राहत होते.
त्यांच्या निधनामुळे नाशिक क्रिकेटमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.