संजू सॅमसनचे फक्त 5 शब्द… ती पोस्ट आणि 10 तासांत लाखो लाईक्स
संजू सॅमसनचे फक्त 5 शब्द… ती पोस्ट आणि 10 तासांत लाखो लाईक्स
img
वैष्णवी सांगळे
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर काल झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ५ विकेट्सनी विजय मिळवला. भारताचा मेहनती खेळाडू संजू सॅमसन याने नाबाद ९७ धावांची शानदार खेळी करत टीम इंडियाला टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. विजयी होताच तो अतिशय भावूक झाला. मैदानावरच तो गुडघे टेकून बसला आणि देवाचे आभार मानले.

त्याच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वोत्तम खेळी खेळल्यानंतर, संजू सॅमसनने सोशल मीडियावर त्याच्या भावना शेअर केल्या. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विजयानंतर मैदानावर बसलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि अवघ्या 5 शब्दांची कॅप्शन त्यासोबत लिहीली. It was all worth it – असं त्याने लिहीलं. त्याच्या या पोस्टवर अवघ्या 10 तासांत 40 लाखांपेक्षा अधिक लाईक्स, रिॲक्शन्स आणि हजारो कमेंट्स आल्या असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सॅमसनची नाबाद 97 धावांची खेळी ही टी 20 वर्ल्डकप मध्ये यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करतानाची चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. एवढंच नव्हे तर, 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरेश रैनाच्या शतकानंतर, टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group