आयपीएल 2026 चा आजचा सामना रद्द होणार ? ईडन गार्डन्सवरुन मोठी बातमी
आयपीएल 2026 चा आजचा सामना रद्द होणार ? ईडन गार्डन्सवरुन मोठी बातमी
img
वैष्णवी सांगळे
आयपीएल 2026 मधील 12वा सामना आज कोलकाता नाइट राइडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगणार असून, हा मुकाबला कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असतानाच ईडन गार्डन्सवरुन मोठी बातमी समोर येत आहे. 

कोलकाता नाइट राइडर्स आणि पंजाब किंग्ससाठी हवामान एक आव्हान ठरू शकते. हवामान विभागाच्या मते, हवामानाचा KKR-PBKS सामन्यावर परिणाम होऊ शकतो. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेमुळेही सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सायंकाळी 7:00 ते 8:00 च्या दरम्यान पावसाची शक्यता 40 टक्के असून, पुढील तासात ती 50 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि रात्री हळूहळू कमी होईल. अशा परिस्थितीत, सामना लवकर संपण्याची शक्यता वाढते.

एका बाजूला कोलकाता संघ पहिल्या विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे, तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्सची टीम सलग तिसऱ्या विजयासाठी जोर लावणार आहे. मात्र, कोलकात्याच्या या हवामानामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये केकेआरचे पारडे जड आहे. केकेआरने 21 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने 13 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना रद्द झाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group