हवामान विभागाची मोठी गुड न्यूज ! अखेर पावसाचे आगमन केव्हा ?
हवामान विभागाची मोठी गुड न्यूज ! अखेर पावसाचे आगमन केव्हा ?
img
Nandini khandare More

सध्याच्या उकाड्याने सर्वच जण त्रस्त झाले असून आता गेल्या काही दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. काही ठिकणी दमट वातावरण तर काही ठिकाणी पावसाची चाहूल असं काहीस साध्याच वातावरण देशभरात आहे. दरम्यान आता  हवामान विभागाकडून मान्सून बाबत खुशखबर आली आहे.  मान्सून संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली असून आता लवकरच भारतात मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यात आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेनं वेगानं आगेकूच सुरू आहे. याही वर्षी वेळेच्या आधीच मान्सून भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झाली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.  मान्सूनच्या मोठ्या ढगाची वाटचाल भारतीय किनारपट्टीच्या दिशेनं सुरू झाली आहे. अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे.

दरम्यान यावर्षी देखील वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन लवकरच होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांमध्ये केरळ, कर्नाटक आणि लक्ष्यद्विपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group