विराट-अनुष्काचं प्रेम पाहून शेफाली बग्गा घायाळ; म्हणाली, 'मैदानात असो वा बाहेर, मला हवा विराटसारखा काळजी घेणारा जोडीदार!
विराट-अनुष्काचं प्रेम पाहून शेफाली बग्गा घायाळ; म्हणाली, 'मैदानात असो वा बाहेर, मला हवा विराटसारखा काळजी घेणारा जोडीदार!
img
नितीशा कुलकर्णी

भारतीय क्रिकेटर  विराट कोहली हा नेहमीच कुठल्याा ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. त्याचा फॅनफॉलोवर देखील खुप मोठा आहे.



विराटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनुष्का शर्माची काळजी घेताना विराट कायमच दिसतो. हेच नाही तर अनुष्काची पर्स घेऊन बाहेर पडतानाही विराट कोहली दिसला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली विदेशात आपल्या कुटुंबासोबत राहतो

. मात्र, विराट विदेशात असला तरीही त्याची जोरदार चर्चा रंगते. नुकताच विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. दोघांचे काही व्हिडीओही पुढे आली. कोणताही क्रिकेट सामना असला तरीही त्याचे लक्ष अनुष्काकडे असते. क्रिकेटच्या मैदानावरील विराट कोहलीचे असे काही व्हिडीओ व्हायरल झाली, ज्यामध्ये तो कितीही बिझी असला तरीही तो पत्नी अनुष्का शर्मा हिची काळजी घेतो.

इशारे करून जेवली का? हे देखील विचारताना विराट अनेकदा दिसला. लोकांना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी प्रचंड आवडते. विराट कोहली ज्याप्रकारे अनुष्काची काळजी घेतो, ते जवळपास मुलींना भावते. आता तर बिग बॉस 13 मधील स्पर्धेक आणि स्पॉट्स प्रेसेंटरने थेट विराट कोहली याच्यासारखा पती हवा असल्याचे म्हटले. गेल्या काही दिवसांपासून शेफाली बग्गा हिचे नाव क्रिकेटर युजवेंद्र चहल याच्यासोबत जोडले जात आहे.

दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसले. आता शेफाली बग्गा हिने विराट कोहलीसारखा पती हवा असल्याचे म्हटले. यासोबतच युजवेंद्र चहलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही तिने भाष्य केले. शेफाली बग्गा म्हणाली की, आम्ही फक्त जेवायला एकत्र गेलो की, लोकांनी थेट आम्ही डेट करत असल्याचे म्हटले.

मी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन थकले आहे. लोकांचे विचार खूप जास्त छोटे आहेत. शेफाली बग्गा हिला विचारण्यात आले की, तू कोणत्या क्रिकेटसोबत डेट करू इच्छिते? मला असा लाईफ पार्टनर हवा आहे जो खूप जास्त काळजी घेणारा, इमोशनल, माझ्यावर लक्ष देणारा आणि असा जो पूर्णपणे आपल्या पत्नीचा होऊन राहणारा… पुढे शेफालीने उदाहरण देत म्हटले की, विराट कोहली आणि अनुष्का शर्माच बघा ना.. विराट कोहली किती बिझी असला तरीही तो अनुष्का शर्माची काळजी घेतो.

त्यांच्यातील प्रेम लगेचच दिसते. आता शैफाली बग्गा हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शेफाली बग्गा शिखर धवन यांच्या लग्नात धमाल करताना दिसली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group