ना तेंडुलकर, ना गावस्कर ! २००८ मध्ये निवृत्त झालेला ‘हा’ खेळाडू हार्दिक पंड्याचा आदर्श, उत्तराने सगळ्यांचंच वेधलं लक्ष
ना तेंडुलकर, ना गावस्कर ! २००८ मध्ये निवृत्त झालेला ‘हा’ खेळाडू हार्दिक पंड्याचा आदर्श, उत्तराने सगळ्यांचंच वेधलं लक्ष
img
वैष्णवी सांगळे
हार्दिक पंड्या हा टीम इंडियातील महत्त्वाचा खेळाडू आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोघांमध्येही तो सरस असल्याने त्याच योगदान भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. हार्दिक हा अष्टपैलू खेळाडू आहे अनेक जण त्याला आदर्श मानतात , मात्र हार्दिक पंड्याचा नेमका आदर्श कोण याबाबत अनेकांना माहिती नाही. याचबाबत त्याने खुलासा केला आहे.  बीसीसीआयच्या नमन अवॉर्ड सोहळ्यादरम्यान हार्दिकने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. 

बीसीसीआय अवॉर्ड सोहळ्यात हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी व संजू सॅमसन यांची खास मुलाखत घेण्यात आली. यामध्ये सर्वांना त्यांचे क्रिकेटमधील आदर्श कोण आहे, हा प्रश्न विचारताच हार्दिक पंड्याने माजी खेळाडू वसीम जाफर यांचं नाव घेतलं. वसीम जाफर यांनी भारतासाठी ३३ सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी वसीम जाफर यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा तयार केला. वसीम जाफर हे रणजी स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारे पहिले खेळाडू आहेत. 

कोण आहे वसीम जाफर?
हार्दिक पंड्याच्या मते, २००० च्या दशकात भारतासाठी खेळलेले माजी सलामीवीर वसीम जाफर हे त्याचे लहानपणापासूनचे क्रिकेटमधील आदर्श होते. जाफर यांनी २००० ते २००८ या कालावधीत भारतासाठी ३१ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण १९४४ धावा, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० धावा केल्या. आठ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी भारतीय संघासाठी ५ शतकं आणि ११ अर्धशतकं झळकावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वसीम जाफर यांनी तज्ज्ञ आणि समालोचक म्हणूनही काम केलं आहे. तसेच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. उजव्या हाताचे फलंदाज असलेल्या वसीम जाफर यांनी अनेक वर्षे मुंबई क्रिकेट संघ आणि विदर्भ क्रिकेट संघ यांचे प्रतिनिधित्व करत रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसले. भारतातील या प्रमुख देशांतर्गत लाल चेंडूच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही जाफर यांच्या नावावर आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group