आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये टीम इंडियाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल १२४ रन्सनी पराभव करत सुवर्णपदकाच्या सामन्यात धडक मारली. आता ३ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुवर्णपदकासाठी महामुकाबला रंगणार आहे. या मुकाबल्याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सेमीफायनल सामना पार पडला. या सामन्याचे नाणेफेक हे श्रीलंकाने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. यानंतर श्रीलंका संघाने केवळ ४५ धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. भारतीय संघाने १२४ धावांनी सामना जिंकला. आता भारतीय संघाची थेट फायनलमध्ये एन्ट्री झाली आहे.
भारताने पुरुष क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना जिंकला आहे. भारताने दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा दारुण पराभव केला. उपांत्य सामन्यात श्रीलंकेला हरवून भारतीय संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. याचा अर्थ आता भारतीय संघ सुवर्णपदकाचा सामना खेळेल, जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशला हरवून आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळण्याचा हक्क पहिल्यांदाच मिळवला आहे.
भारताने श्रीलंकेसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. एकट्या इशान किशनने श्रीलंकेला धु धु धुतले. बिहारच्या लालाने श्रीलंकेविरुद्ध ८० धावा केल्या. इशानच्या जीवावर भारतीय संघाने इतका मोठा घावांचा डोंगर उभारला. मात्र, याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या सर्वात कमी धावसंख्येवर गारद झाला. श्रीलंकेने भारताविरुद्ध केवळ ४५ धावा केल्या, जी त्यांची टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, श्रीलंकेची टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या ७७ होती, जी त्यांनी जून २०२४ मध्ये न्यूयॉर्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती.
आता भारत पाक यांच्यात सुवर्ण लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ ऑक्टोबरला फायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना सकाळी १० वाजता रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला म्हटलं की चाहते भलतेच उत्सुक होतात. तुम्हाला हा सामना सोनी स्पोटर्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर हा सामना रविवारी असल्यामुळे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.