भारत विरुद्ध झिम्बाब्वे  टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा भारतावर 13 धावांनी विजय
भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा भारतावर 13 धावांनी विजय
img
Jayshri Rajesh
भारत  विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० च्या पहिल्याच सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. झिम्बाब्वेने भारताला 13 धावांनी पराभूत केलं. कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलचा हा निर्णय फसला. 

झिम्बाब्वेने 20 षटकात 9 गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 116 धावांचं आव्हान दिलं. आयपीएलमधील हिरोंसाठी ही धावसंख्या तशी सोपी होती. मात्र  एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला. कर्णधार शुबमन गिलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्यामुळे भारतावर पहिल्याच सामन्यात पराभव झाला. 

 शुबमन गिलने 29 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.टी20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारणारा शुबमन गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे या यादीत होते. दुसरीकडे, 2024 या वर्षातील टीम इंडियाचा पहिलाच पराभव आहे.

आयपीएलमध्ये हिरो ठरलेले अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच फेल ठरले. अभिषेक शर्माला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. रियाने परागने 2, तर ध्रुव जुरेलने 7 धावा केल्या. रिंकू सिंहकडून भरपूर अपेक्षा असताना त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले हे खेळाडू मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात झिरो ठरले. वॉशिंग्टन सुंदरने 34 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. मात्र विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group