"त्या" प्रश्नावर बीसीसीआयनं अखेर सोडलं मौन ; नेमकं काय म्हणाले बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला?
img
Dipali Ghadwaje
इंग्लंड दौऱ्याच्या आधीच टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकाच वेळी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. दोघांच्याही अचानक घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान या निवृत्तीमागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  , मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा काही हस्तक्षेप होता का अशा चर्चा सुरू होत्या. मात्र अशातच आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे सर्व स्पष्ट केलं आहे.

राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, ही दोघांची स्वतःची इच्छा होती. बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला निवृत्त होण्यास सांगत नाही. आम्हाला देखील दोघांची कमतरता जाणवते. पण हे त्यांचा स्वतःचा निर्णय होता,”

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group