श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर दोन महिने तो मैदानापासून दूर राहीला. त्यामुळे तो क्रिकेटच्या मैदानात परत केव्हा उतरणार यासाठी चाहते उत्सुक होते. आता श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्रेयस अय्यरचं अखेर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन ठरलं आहे. ६ जानेवारीला श्रेयस अय्यर पहिला सामना खेळणार आहे.
श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीत मुंबईसाठी पुढचा सामना खेळणार आहे. त्याला या सामन्यात खेळण्यासाठी बीसीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये अय्यर १० दिवस होता. त्यात त्याने सर्व टेस्ट पास केल्या आहेत श्रेयस अय्यरने २ जानेवारीला प्रॅक्टिस गेम खेळला. त्यात त्याला कुठेही दुखापत जाणवली नाही.
श्रेयस अय्यर ६ जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याने त्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा मार्ग मोकळा दिसत आहे.न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिकेत त्याची निवड होऊ शकते. त्याला सब्जेक्ट टू फिटनेस अंतर्गत सहभागी केलं जाऊ शकतं. ६ जानेवारी फिटनेस टेस्ट पास केलं तर त्याला संधी मिळू शकते.
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे ऋतुराज गायकवाडचं नुकसान होऊ शकते. त्याच्या गैरहजेरीत ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. जर श्रेयस अय्यर फिट झाला तर ऋतुराज गायकवाडला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे.