श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; अंतर्गत रक्तस्त्राव अन...महत्वाची माहिती समोर
श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; अंतर्गत रक्तस्त्राव अन...महत्वाची माहिती समोर
img
वैष्णवी सांगळे
क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला ICU मध्ये ठेवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना मार लागला आहे. सिडनी येथे वनडे सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ही घटना घडलीये. 


खबरदारी म्हणून श्रेयसला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवलं आहे. त्याला पाच ते सात दिवस रुग्णालयातच रहावं लागेल अशी शक्यता आहे.श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना मार लागला आहे. सिडनी येथे वनडे सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ही घटना घडली. ऑस्ट्रेलियन इनिंगच्या ३४ व्या ओव्हरमध्ये श्रेयसला ही दुखापत झाली. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीचा कॅच पकडताना श्रेयसला मार लागला. 

बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने मागे पळत जाऊन कॅच पकडली. पण त्याला इंजरी झाली. दुखापतीमुळे श्रेयस अय्यरची वाईट अवस्था होती. मैदानावरच तो पोट आणि छातीचा भाग पकडून वेदनेने विव्हळताना दिसलेला. त्यानंतर मेडिकल टीम त्याला मैदानाबाहेर घेऊन गेली. आता त्याच्या इंजरीची गंभीरता लक्षात घेऊन सिडनीच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group