गिलला विश्रांती, रोहित कर्णधार ! टीम इंडियात होणार मोठा बदल
गिलला विश्रांती, रोहित कर्णधार ! टीम इंडियात होणार मोठा बदल
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर भारतीय संघ एकही वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. आता भारतीय संघ येत्या काही दिवसात आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. १९ ऑक्टोबरपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. विराट आणि रोहित दोघेही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विराट आणि रोहित ही मालिका खेळणार की नाही? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

हे ही वाचा 
नाशिक : तुम मराठी लोग तुम्हारे औकात में रहो; नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी

वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. युवा फलंदाज शुबमन गिल हा वनडे संघाचा उपकर्णधार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शुबमन गिलला या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. शुबमन गिलची आशिया चषकासाठी भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गिलला विश्रांती दिल्यामुळे यशस्वी जैस्वालचं वनडे संघात पुनरागमन करण्याचं दार उघडणार आहे. 

हे ही वाचा 
वर्चस्ववादातून दोन गटात राडा; तुंबळ दगडफेक अन् जाळपोळ; कुठे घडली घटना ?

या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी दिली जाऊ शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती यांना संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group