रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नेतृत्वाच्या दबावामुळे फलंदाजांची कामगिरी खालावते. पण गिलकडे जेव्हापासून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तेव्हापासून त्याच्या फलंदाजीचा स्तर आणखी उंचावला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याने ७५० हून अधिक धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावले होते. आता वेस्टइंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने दमदार शतक झळकावलं आहे. त्याने कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले. यासह त्याने मोठा विक्रम मोडून काढला आहे.
शुबमन गिलचे कर्णधार म्हणून ५ वे आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेले १० वे शतक ठरले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत हे त्याचे १० वे शतक आहे. यासह तो भारतीय संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताची माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता.
रोहितने या स्पर्धेत ९ शतकं झळकावली होती. आता गिलने हा विक्रम मोडून काढला आहे. गिल या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत यशस्वी जैस्वालचा देखील समावेश आहे. यशस्वीच्या नावे ७ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर ऋषभ पंतने ६ आणि केएल राहुलने देखील ६ शतकं झळकावली आहेत.