कसोटी रँकिंगचा खेळ पलटला ! शुभमन गिलची उल्लेखनीय कामगिरी
कसोटी रँकिंगचा खेळ पलटला ! शुभमन गिलची उल्लेखनीय कामगिरी
img
दैनिक भ्रमर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या नवीन क्रमवारीत अनेक महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत. विशेषतः, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे, त्याच वेळी, भारताचा नवोदित फलंदाज शुभमन गिलने उल्लेखनीय प्रगती करत थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार, जो रूट आता अव्वल क्रमांकाचा फलंदाज राहिलेला नाही. इंग्लंडच्याच हॅरी ब्रूकने हे स्थान पटकावले आहे. हॅरी ब्रूकचे रेटिंग आता 886 पर्यंत पोहोचले आहे. जो रूट अव्वल स्थानावर नसला तरी, तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 868 आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 867 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. यशस्वी जैस्वालच्या रेटिंगमध्ये बदल झाला असला तरी, त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 858 आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपले पाचवे स्थान अबाधित राखण्यात यशस्वी झाला आहे. त्याचे रेटिंग सध्या 813 आहे. यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलने क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. याच कामगिरीचे फळ म्हणून त्याला तब्बल 15 स्थानांची बढती मिळाली आहे. तो आता थेट सहाव्या स्थानी पोहोचला असून, त्याचे मानांकन 807 झाले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group