रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये 'हा' इतिहास रचणार
रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये 'हा' इतिहास रचणार
img
दैनिक भ्रमर
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 33 वी मॅच होणार आहे. गुणतालिकेत सध्या आठव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेले पंजाब आणि मुंबई आमने सामने येईल.  पंजाब किंग्जनं सहापैकी चार सामन्यात पराभव स्वीकारलेला असून त्यांना केवळ दोन मॅचमध्ये देखील विजय मिळवता आलेला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सची देखील तशीच स्थिती आहे. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं आहे. त्यांना देखील चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आज आणि एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. 

रोहित शर्माचं पुढचं पाऊल

आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वी मॅच खेळेल.  यापूर्वी ही कामगिरी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे.आता रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरणार आहे.रोहित शर्मानं आयपीएलमध्ये यापूर्वी 249 मॅच खेळलेल्या आहेत. यामध्ये त्यानं 6472 धावा केलेल्या आहेत. रोहित शर्मानं 30.10 च्या सरासरीनं 131.22 च्या स्ट्राइक रेटनं या धावा काढलेल्या आहेत. रोहितनं आयपीएलमध्ये 42 अर्धशतकं झळकवली असून दोन शतकं देखील केली आहेत. रोहित शर्माची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 109 इतकी आहे. रोहित शर्मानं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. मात्र, मुंबईला विजय मिळवता आला नव्हता.

'या' राज्यात रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी, दगडफेक ; अनेक जण जखमी

मुंबई आणि पंजाब आमने सामने

यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येतील. दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे दोन्ही संघ आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला मोठ्या फरकरानं पराभूत केल्यानं त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीतील स्थान कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.  मुंबई इंडियन्स सलग चार मॅच होम ग्राऊंडवर खेळल्यानंतर पंजाब किंग्जच्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील चार मॅचेसमध्ये मुंबई इंडियन्सला दोन मॅचमध्ये विजय मिळाला तर दोनमध्ये पराभव स्वीकारावा लागला.  रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे.  मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या करत असून यावेळी मुंबईनं सहापैकी चार वेळा पराभव स्वीकारावा लागला. तर, मुंबई इंडियन्सनं दोन मॅचमध्ये विजय मिळवला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group