राजस्थान अव्वल स्थानी कायम ; मुंबईची ही मोठी झेप ; पाहा आयपीएलचे 'लेटेस्ट पॉइंट टेबल'
राजस्थान अव्वल स्थानी कायम ; मुंबईची ही मोठी झेप ; पाहा आयपीएलचे 'लेटेस्ट पॉइंट टेबल'
img
दैनिक भ्रमर
आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला. मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात मुंबईने 9 धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत. पंजाबविरुद्धच्या विजयानंतर मुंबईचे 6 गुण झाले आहेत. तर पंजाबचे 4 गुण आहेत. मुंबईने 6 गुणांसह -0.133 च्या नेट रनरेटसह 7 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर सामना गमावलेला पंजाबच्या संघाने 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह 9 व्या स्थानावर आहे.

गुणतालिकेत अव्वल 4 संघ कोणते?

गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले असून, त्यानंतर त्यांचे 12 गुण झाले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाताचा नेट रनरेट +1.399 आहे, चेन्नईचा +0.726 आणि हैदराबादचा +0.502 आहे.


इतर संघाची काय अवस्था?

लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे, दिल्लीचा आहे -0.074 आणि मुंबई इंडियन्सचा -0.133 आहे. यानंतर पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूचे 2 गुण आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group