देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या 17व्या हंगामातील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले होते.
आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. 26 मे 2024 रोजी अंतिम सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमेनेटर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. 21 मे आणि 22 मे या रोजी हे दोन्ही सामने होणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात एकूण 7 डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता चालू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. इतर दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होतील. याशिवाय यंदा होम - अवे या पद्धतीनेच सामने खेळवले जाणार आहेत.
म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात सामने खेळताना दिसणार आहे.