आयपीएल 2024 मध्ये दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. पण लवकरच मोठी उलथापालथ होऊ शकते. बीसीसीआय आयपीएलच्या कर्णधारांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
आयपीएल 2024 दरम्यान केवळ एक किंवा दोन फ्रँचायझींच्या नाही तर एकूण 7 संघांच्या कर्णधारांवर बंदी घातली जाऊ शकते. कालपर्यंत या यादीत केवळ 5 कर्णधारांची नावे होते, ज्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते. परंतु आता या यादीत आणखी 2 कर्णधारांची नावे समाविष्ट झाला आहे.
चेन्नई आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. या सामन्यानंतर बीसीसीआयने दोन्ही कर्णधारांवर प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
स्लो ओव्हर रेटसाठी दोघांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने 5 कर्णधारांवर हा दंड ठोठावला होता. हार्दिक पांड्या, शुभमन गिल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल यांच्या नावांचा या विशेष यादीत समावेश आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच स्लोओव्हर रेटमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा कर्णधाराला 24 लाख रुपये आणि संघातील खेळाडूंना 6 लाख. जर ही चुक तिसऱ्यांदा झाली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.
या यादीत समाविष्ट असलेल्या कर्णधारांपैकी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला सर्वात जास्त टेन्शन आहे. कारण पंतला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे, आता जर पंतला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. बीसीसीआयच्या निर्णयामुळे आयपीएलमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते.