धक्कादायक ! दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू दरोड्याच्या प्रकरणात दोषी, कोर्टाने सुनावली शिक्षा
धक्कादायक ! दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू दरोड्याच्या प्रकरणात दोषी, कोर्टाने सुनावली शिक्षा
img
वैष्णवी सांगळे
क्रिकेट विश्वातून एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे.दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू दरोड्याच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. वर्ल्डकप खेळणाऱ्या क्रिकेटपटूकडे मोठ्या आदराने पहिले जाते. मात्र एक नाही तर दोनदा वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू हा दरोडेखोर झाल्याचं आणि कोर्टाने त्याला शिक्षा सुनावल्याची ही ऐतिहासिक घटना असेल. 

आरक्षणावरून महाराष्ट्र तापला... राजधानीत मराठा तर उपराजधानीत ओबीसी

ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडे असलेल्या पापुआ न्यू गिनी या बेटावर ही घटना घडली आहे. दरोडा प्रकरणात पापुआ न्यू गिनीचा क्रिकेटपटू किपलिंग डोरिगा दोषी आढळला आहे. दरोड्याची गंभीर घटना सोमवार, २५ ऑगस्ट रोजी सेंट हेलियर्स परिसरात घडली होती. २८ नोव्हेंबर रोजी किपलिंग डोरिगाला रॉयल कोर्टात हजर करण्यात आले. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारला आणि कारागृहात पाठवून दिले. 

घरचा आहेर ! विशेष अधिवेशन बोलवा; मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार आक्रमक

२०२१ आणि २०२४ या दोन टी-२० वर्ल्डकप स्पर्धांमध्ये किपलिंग डोरिगाने पापुआ न्यू गिनी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग पापुआ न्यू गिनीमध्ये खेळली जात आहे, याच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांसाठी डोरिगा याची न्यू गिनी टीममध्ये निवड झाली आहे. किपलिंग डोरिगा याला बुधवारी सकाळी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले, जिथे त्याला दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group