बार कौन्सिलचा मोठा निर्णय ! सोमवारी ‘वकिली’ बंद राहणार , कारण...
बार कौन्सिलचा मोठा निर्णय ! सोमवारी ‘वकिली’ बंद राहणार , कारण...
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून वकिलांवरील हल्ले वाढले आहे. धक्कादायक म्हणजे हल्ल्यात काही वकिलांनी प्राणही गमावले आहे. वकिलांवरील हेच वाढते हल्ले रोखण्यासाठी ‘ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल’ मंजूर करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने येत्या ३ नोव्हेंबर रोजी म्हणजेच सोमवारी राज्यातील सर्वच न्यायालये, खंडपीठातील वकिली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 



नुकत्याच अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातील वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने सर्वसाधारण सभेत २९ ऑक्टोबर रोजी हल्ल्याचा तीव्र निषेध करून ठराव पारित केला आहे. मुख्य म्हणजे यात सर्वच सनदधारक वकील ३ नोव्हेंबर रोजी एकूणच न्यायालयायीन कामकाजापासून अलिप्त राहतील, असा ठराव बार कौन्सिलने घेतला आहे. 



वकिलांच्या आत्मसन्मानासाठी, सुरक्षेसाठी आणि बार असोसिएशनच्या स्वातंत्र्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी सर्वच वकील न्यायालयीन कामकाजापासून एक दिवस अलिप्त राहून निषेध व्यक्त करणार आहेत, असे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. अमोल सावंत आणि नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले आहे.
court |
इतर बातम्या
Join Whatsapp Group