बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे.
न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये अक्षयच्या हत्येला पोलिसच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.