बदलापूर प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा ! नराधमाने आणखी एका मुलीवर केला अत्याचार
बदलापूर प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा ! नराधमाने आणखी एका मुलीवर केला अत्याचार
img
दैनिक भ्रमर
बदलापुरातील नामांकित शाळेत शिकत असलेल्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली . या प्रकरणी अक्षय शिंदे याला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान , अक्षय शिंदे याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील आणखी एका मुलीवर त्याने अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र, या नवीन धक्कादायक खुलाश्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की , बदलापूर अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली व तापासासाठी SIT स्थापन करण्यात आली.बदलापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे गेल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एसआयटीला आधीपासूनच अक्षय शिंदे यांनी आणखी काही चिमुरडींवरडीं अत्याचार केल्याचा संशय होता.त्यानुसार त्यांनी पालकांना समोर येण्याचे अवाहनदेखील केले होते. एसआयटीच्या तपासातच आणखी एकधक्कादायक बाब समोर आली आहे. अक्षय शिंदे याने शाळेतीलच आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचंसमोर आलं आहे. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी कडून नराधम अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group