बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
img
दैनिक भ्रमर
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. गावातीलच लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे.  बदलापुरातील एका शाळेत झालेल्या लहान मुलींच्या लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची  तोडफोड करण्यात आली आहे.

अक्षय शिंदे हा शाळेचाच कर्मचारी असून आरोपीने शाळेतील दोन मुलींवर लैंगिक शोषण केले होते. या घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान काही आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर जमा होत रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन सुरु केले होते. ज्यामुळे जवळपास ८ ते ९ तास रेल्वे सेवा बंद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. सर्व आंदोलकांना रेल्वे स्थानकापासून दूर केले गेले त्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती.

दरम्यान , बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी देण्याची आंदोलकांची मागणी आहे. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टाला विनंती केली होती की, आरोपीने आणखी काही मुलींवर अशाच प्रकारे शोषण केले आहे याची चौकशी करायची आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का याचा देखील शोध घ्यायचा आहे. त्यावर कोर्टाने आरोपाला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूर घटनेचे पडसाद दिल्लीत देखील पाहायला मिळाले. केंद्रीय बालहक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

 बदलापूरच्या घटनेवर माहिती देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group