डोंबिवलीतील अपघाताचे पडसाद कायम; दिवा स्थानकात प्रवाशांची 'तुफान' गर्दी, मध्य रेल्वेचा खोळंबा!
डोंबिवलीतील अपघाताचे पडसाद कायम; दिवा स्थानकात प्रवाशांची 'तुफान' गर्दी, मध्य रेल्वेचा खोळंबा!
img
नितीशा कुलकर्णी



मुंबई मधून लोकल संदर्भात अनेक बातम्या समोर येत असतात. अशातच आता मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली स्थानकात सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरुन अपघात झालाल्याची बाातमी समोर आली.

त्यामुळे काल सकाळी ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्काळीत होऊन प्रवाशांचे हाल झाले होते.

त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात (Diva Railway station) प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. दिवा रेल्वे स्थानकातील हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये दिवा स्थानकातील रेल्वे  प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना प्रवाशांची प्रचंड गर्दी (Crowd) झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकापर्यंत खच्चून गर्दी दिसत आहे. (Mumbai Railway trains delayed)

या सगळ्याचे कारणही आता समोर आले आहे. आज सकाळपासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. काल डोंबिवली इथे लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने सकाळी लोकल उशिराने येत होत्या.

सोमवारी रात्री खर्डी स्टेशन जवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला होता, तो ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणे अपेक्षित होते. मात्र, हा ब्लॉक सकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता. त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस बंद राहिल्या. परिणामी आजदेखील मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group