राजकीय वर्तुळात 'मध्यरात्री' मोठा भूकंप? फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्याने खळबळ; भाजप आक्रमक, तर राऊतांचे सूचक मौन!
राजकीय वर्तुळात 'मध्यरात्री' मोठा भूकंप? फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्याने खळबळ; भाजप आक्रमक, तर राऊतांचे सूचक मौन!
img
नितीशा कुलकर्णी








मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी मध्यरात्री 'वर्षा' निवासस्थानी गुप्त भेट झाल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या 'प्रबुद्ध भारत' या मीडिया हाऊसने हा दावा केला असून, ही भेट विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने झाल्याचे बोलले जात आहे.


मात्र, भाजपने हे वृत्त 'धादांत खोटे' असल्याचे सांगत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी "अशी माहिती असली तरी मी का सांगू?" असे सूचक वक्तव्य केल्याने या कथित भेटीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.


विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले असल्याची चर्चा आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या चर्चेला दुजोरा मिळालेला नाही. ही बातमी खरी असल्याचा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा दावा आहे.


देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही विधान परिषदेच्या अनुषंगाने भेटल्याचं सांगितलं जात आहे, या भेटीबाबत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. तर मध्यरात्री झालेल्या या भेटीत फक्त विधान परिषदेची चर्चा झाली की अन्य कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.


बुधवारी मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा केला जात आहे. एका ओळीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. खोटी बातमी पसरवलेली आहे. अशा पद्धतीची कुठलीही भेट झालेली नाही, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली.


भेटीबाबत प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यम हॅण्डलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई जाईल, असं भाजपचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.

प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या पोस्टने चर्चेला उधाण

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून  "मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.", अशी पोस्ट २३ एप्रिल रोजी शेअर करण्यात आली होती. त्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.


या भेटीमागे विधानपरिषद निवडणूक असल्याचं बोललं जात आहे, तर एबीपी माझाने काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी काही नेत्यांनी या भेटीच्या चर्चा नाकारल्या आहेत तर काहींनी भेटीला दुजारा दिलेला नाही. हा दावा केवळ प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा आहे, या भेटीबाबत त्यांच्याकडे देखील आणखी काही माहिती नाही.


देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत राऊत काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली का याचे उत्तर ते दोन्ही नेतेच देऊ शकतात.  बैठका आणि बाकीच्या गोष्टीमध्ये ततुम्हाही महत्त्वाचे नेते आहात याची काही माहिती आहे का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, याबाबतची माहिती माझ्याकडे असली तरी मी तुम्हाला का सांगू, बऱ्याच गोष्टी राजकारणात घडणार आहेत, मी का सांगू. आत्ताच कशा करतात त्याच्यावर पाणी ओतायचं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांचा ऑपरेशन टागर बाबातचा दावा काय?

शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन टायगरबाबात प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, योग्य वेळी राजकीय भूकंप होईल असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे, आम्ही ऑपरेशन टायगर करतोय असा कोणताही भाग नाही, मागेही आम्ही एकदा स्पष्ट केलं आहे की आमची त्यांची कोणती बैठक झाली नाही, ज्या दिवशी ऑपरेशन टायगर करायचा आहे तर ते असं सांगून केलं जात नाही, आमच्या संपर्कात भले सगळे आहेत , मी हे नाकारत नाही आमच्या संपर्कात ते नाहीत असं नाही, संपर्कात आहेत.

परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा हा सर्व भाग एकनाथ शिंदेंचा आहे, आजच्या घडीला तरी ऑपरेशन टायगर करायच्या मनस्थितीत नाही, शिंदे साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील, त्यावेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात वेगळा राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळेल असेही ते म्हणाले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group