करो या मरो! लखनऊ आणि मुंबईचे भवितव्य आता 'या' ४ सामन्यांवर; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणाचं पारडं जड?
करो या मरो! लखनऊ आणि मुंबईचे भवितव्य आता 'या' ४ सामन्यांवर; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणाचं पारडं जड?
img
नितीशा कुलकर्णी






आयपीएल २०२६ मधील 'करो या मरो'च्या लढतीत लखनऊ सुपर जायंट्सने आरसीबीचा पराभव केला खरा, पण या निकालाने मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लखनऊच्या या विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा पुन्हा पालवल्या असून, पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसाठी बाद फेरीची दारे उघडली आहेत. नक्की काय आहे प्लेऑफचं हे गणित आणि मुंबईला आता काय करावं लागणार? जाणून घ्या सविस्तर...

लखनऊच्या या विजयाने मुंबई इंडियन्सला देखील मोठा फायदा झाला आहे.कारण लखनऊ जिंकल्याने मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा जीवंत राहिल्या आहेत. आयपीएलमध्ये गुरुवारी लखनऊ सूपर जाएटसने डीएलएल मेथडनूसार आरसीबीचा 9 धावांनी पराभव केला आहे. पावसामुळे हा सामना 19 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रोमहर्षक सामन्यात आरसीबी 203 धावाच करू शकली होती. त्यामुळे लखनऊ सूपर जाएटसने डीएलएल मेथडनूसार आरसीबीचा 9 धावांनी पराभव केला. लखनऊच्या या विजयाने आरसीबीला सर्वांत मोठा झटका बसला आहे. कारण नेट रनरेटच्या बळावर आरसीबीला टेबल टॉप करण्याची संधी होती.

पण आरसीबीची ही संधी हुकली होती. लखनऊचे या विजयानंतर 10 सामन्यात 6 गुण झाले आहे. लखनऊने हा सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पण आता पुढे एकही पराभव त्यांच्या आशेवर पाणी फिरू शकतो. लखनऊच्या या विजयाने मुंबई इंडियन्सला देखील मोठा फायदा झाला आहे.कारण लखनऊ जिंकल्याने मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा जीवंत राहिल्या आहेत. आता लखनऊ आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाचे प्रत्येकी 4 सामने उरले आहे.

या चारही सामन्यात विजय मिळवून दोन्ही टीमना 14 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.पण दोन्ही टीमना इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. पण या सगळ्यात मुंबई इंडियन्सला सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहोचायची संधी आहे.कारण मुंबईचा रनरेट हा लखनऊपेक्षा कमी आहे.त्यामुळे 14 गुण मिळवून मुंबई इंडियन्स पहिल्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचणार आहे. विशेष म्हणजे मुंबईला इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group