मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात भरदिवसा विकासकावर गोळीबार करण्यात आला.
कांदिवली चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञाताकडून फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार करण्यात आला. फ्रेंडीभाई हा तरुण बांधकाम विकास आहे, ते कारमध्ये बसले असताना दोघांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी, अज्ञातांनी दोन ते तीन राउंड फायर केले, त्यामध्ये दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जखमी तरुणाला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गोळीबारच्या घटनेनंतर चारकोप पोलीस घटनस्थळावर दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.