मोठी बातमी : कॅब चालकाची विष पिऊन आत्महत्या , ओला-उबर चालक आंदोलन चिघळणार?
मोठी बातमी : कॅब चालकाची विष पिऊन आत्महत्या , ओला-उबर चालक आंदोलन चिघळणार?
img
Dipali Ghadwaje
राहत्या घरी विष प्राशन करून ओला-उबर चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. त्यामुळे वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून ओला आणि उबर चालकांचे भाडेवाढीसाठी सुरू असलेले आंदोलन आता भीषण वळणावर पोहोचले आहे. 

दरम्यान  शासनाकडून कोणतेही सकारात्मक आश्वासन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या या ओला चालकाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान सनोज सक्सेना (वय ४५ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या ओला चालकाचे नाव असून तो नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.

स्थानिक नागरिकांनी या चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.

या घटनेमुळे चालकांच्या संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारने तत्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
 
mumbai | Uber | ola | cab |
इतर बातम्या
Join Whatsapp Group