खळबळजनक ! मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, ४०० किलो RDX, ३४ वाहनांमध्ये …
खळबळजनक ! मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, ४०० किलो RDX, ३४ वाहनांमध्ये …
img
वैष्णवी सांगळे
उद्या गणेश विसर्जन सोहळा आहे, त्यामुळे नागरिकांची रस्त्यावर मोठी वर्दळ असणार आहे. पण त्यात आता एक टेन्शन वाढवणारी मोठी बातमी मुंबईतून समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या असून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

आजचे राशिभविष्य ! ५ सप्टेंबर २०२५; थांबलेली कामे आज पूर्ण होणार ? वाचा

उद्या अनंत चतुर्दशी असतानाच बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा एक मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचं या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. या संदेशात ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, ४०० किलो आरडीएक्समुळे १ कोटी लोक मृत्युमुखी पडतील असं म्हटलं आहे. 

शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार; अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

त्यासोबतच ‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख देखील या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवरची जबाबदारी आणखी वाढली आहे.  मुंबई पोलिसांमुळेच मुंबईकरांना गणेशोत्सव कुठल्याही विघ्नाशिवाय आनंदात साजरा करता आला. चिंता करण्यातं कुठलही कारण नव्हतं, कारण पाठिशी मुंबई पोलीस उभे होते. पण धमकीच्या मेसेजमुळे उद्या मुंबई पोलिसांची मोठी परीक्षाच असेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group