शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार; अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार; अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
आज शिक्षक दिन, शिक्षकांना सर्वच शुभेच्छा देत असताना बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने शिक्षक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

भयानक ! पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या; प्रियकराला घरी बोलावलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नारायण शिंदेने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील आहे. गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्यासाठी नारायण शिंदे याने आमदार धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची मदत घेतली होती. त्यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

धक्कादायक ! बापाच्या हत्येचा घेतला 'असा' बदला, आरोपी अन् त्याच्या आईला...

तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकीन. माझी वरपर्यंत पोहोच आहे असे म्हणत धमकी दिल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नारायण शिंदे याचा शोध आता शिवाजीनगर पोलीस घेत आहेत.
rape | Beed |
इतर बातम्या
Join Whatsapp Group