फेसबुक लाईव्ह सुरु होतं बायकोमध्येच किंचाळली, नवऱ्यासोबत घडलं असं काही की...
फेसबुक लाईव्ह सुरु होतं बायकोमध्येच किंचाळली, नवऱ्यासोबत घडलं असं काही की...
img
वैष्णवी सांगळे
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उसाच्या हंगामात येथील लाखो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी राज्याच्या विविध भागांत तसेच परराज्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हेही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीसाठी बाहेर पडले होते. 



मेहनतीच्या घामातून आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून गणेश डोंगरे हे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणीसाठी गेले होते. मात्र, ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याने गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

यावर्षी गणेश डोंगरे लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. याच वेळी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक कामगार जखमी झाला. काही क्षणांतच अश्विनीच्या डोळ्यांसमोर होत्याचं नव्हतं झालं.

या दुर्घटनेला आणखी वेदनादायक बनवणारी बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह होती. लाईव्ह सुरू असतानाच ट्रॉली गणेश यांच्या अंगावर पडली. पतीचा मृत्यू पत्नीच्या डोळ्यादेखत घडताच तिच्यावर जणू आभाळ कोसळलं. काही क्षणांतच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पसरली आणि संपूर्ण जिल्हा अक्षरशः हादरून गेला.
Beed | latur |
इतर बातम्या
Join Whatsapp Group