गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांनी चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले.
या प्रकरणनंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच रमजान ईदच्या काही तास आधीच मशिदीत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.
बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात एका मशिदे मध्ये स्फोट करण्यात आला. या घटनेने संपूर्ण बीड हादरलं आहे.
रमझान ईदच्या काही तासापूर्वी बीडमधील अर्धामसला गावातील मशिदीत पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. या दरम्यान, पोलिसांनी स्फोट प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत मशीदी मधील फरशी आणि बांधकामाला तडे गेले आहेत. अज्ञात माथेफिरूने हे कृत्य केलं असून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी दाखल आहेत. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माथे फिरूने हे कृत्य केलं आहे. यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. तर पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.