बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे सुत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडविषयी अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात मकोका अंतर्गत कोठडीत असणाऱ्या वाल्मीक कराड याची सात दिवसांची सीआयडी कोठडी आज संपत आहे. साधारण 11 वाजता बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केले जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने ही सुनावणी VC द्वारे होण्याची शक्यता आहे.
खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडला देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले. यादरम्यान 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. ही कोठडी आज पूर्ण होत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
त्यामुळे कराडला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी यावर आज निर्णय होणार आहे. आजच्या या न्यायालयीन प्रक्रियेसाठी सीआयडीचे कर्मचारी न्यायालयात पोहोचले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यात एसआरपी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
न्यायालयीन कोठडी की सीआडी कोठडी?
मस्साजेागचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मकोका लावण्यात आल्यानंतर 15 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी एसआयटीने अधिक तपासासाठी कोर्टाकडे 10 दिवसांची कोठडी मागितली होती.मात्र, न्यायालयाने वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची कोठडी सुनावली होती.
दरम्यान, आज ही कोठडी संपणार असून वाल्मिक कराडला आज 11 वाजता बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने ही सुनावणी VC द्वारे होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये मागील दीड महिन्यांपासून प्रचंड तणावाचे वातावरण आहे.