संतोष देशमुखांची लेक झाली पास! किती टक्के मिळाले? वाचा
संतोष देशमुखांची लेक झाली पास! किती टक्के मिळाले? वाचा
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीचा बारावीचा निकाल समोर आला आहे. वैभवी देशमुख हिला बारावीला ८५. ३३ टक्के मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. 

वैभवी देशमुख हिचं देखील हे बारावीचं वर्ष होतं. तिने बारावीला ८५. ३३ टक्के मिळवून यश संपादन केलंय. दिवंगत संतोष देशमुख यांची  निर्घृण हत्या करण्यात आली होती. कुटुंबावर दुखा:चं डोंगर होतं. तरी देखील मागे न हटता, या परिस्थितीतून जात तिने चिकाटीने अभ्यास करून पास झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group