संतोष देशमुख हत्या प्रकरण ; न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, कोर्टात आज काय काय घडलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरण ; न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, कोर्टात आज काय काय घडलं?
img
Vaishnavi Sangale
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर उभ्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलच तापलं. यातील एक संशयित अद्यापही फरार आहे.  संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. 

कराडचे वकील विकास खाडे काय म्हणाले?
वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले. तर वाल्मीक कराडचा जामीन अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सर्व आरोपींच्या वकिलांकडून दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संपत्ती जप्तीबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. आम्ही जे बँक खाते गोठवण्यात आले. त्यावरील निर्बंध उठविण्याबाबत बाजू मांडली. याबाबत सुनावणी झाली. पुढील तारखेला याबाबत न्यायालय निर्णय देईल, असं विकास खाडे यांनी सांगितले. 

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे "त्या" आरोपावर स्पष्टच बोलले; म्हणाले रमी खेळण्यासाठी....

 उज्ज्वल निकम काय म्हणाले ? 
वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं. याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारा विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे असा विनंती अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group