बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर निष्पक्षपातीपणे तपास व्हावा यासाठी आंदोलन करत, घरात लहान भाऊ, आई, लढणारा काका यांच्यासोबत उभं राहून संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने बारावीला चांगला अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
आज बारावीचा निकाल लागला वैभवीला 85.33% टक्के गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुखांच्या मुलीला वैभवीला कॉल केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मिळालेल्या यशाबद्दल वैभवी देशमुख हीच अभिनंदन केलं. यावेळी सगळा आनंद हिरावून घेतला ताई, आता काय उपयोग असं म्हणत वैभवी देशमुखने आपल्या वडिलांच्या नसण्याची खंत व्यक्त केली.
सुप्रिया सुळेंना फोनवरती बोलताना वैभवीने आता फक्त न्याय मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सुप्रिया सुळे यांनी मला तुझा खूप अभिमान आहे, असं म्हणत वैभवीचं कौतुक केलं आहे.
वैभवीला 85.33% मिळाले
आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे.