बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेने सर्वत्रच खळबळ उडाली आहे. प्रेमात माणूस काय करू शकतो याच हे जिवंत उदाहरण. लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून झालेली फसवणूक, मालमत्तेवर तगादा आणि धक्कादायक म्हणजे ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे गोविंद यांनी थेट स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली असा आरोप आहे.
प्रेमात गुंतलेल्या गोविंदने पूजासाठी महागडे दागिने, मोबाईल, मोटारसायकल, प्लॉट, शेती आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. याशिवाय, गेवराई येथे एक भव्य बंगलाही उभारला, ज्यामध्ये गोविंदच्या पत्नीसह मुले आणि वडील राहत होते. पूजा काही दिवस त्या बंगल्यात राहिल्यानंतर तिने हा बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी गोविंदवर तगादा लावला. गोविंदने समजावण्याचा प्रयत्न करत, "तुझ्यासाठी दुसरा बंगला उभारतो" असे सांगितले, मात्र पूजा त्यावर ठाम नव्हती. उलट, तिने गोविंदला "बंगला माझ्या नावावर केला नाहीस, तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन" अशी धमकी दिली आणि त्याच्याशी सर्व संपर्क तोडला.
पूजाच्या या वागणुकीमुळे गोविंद मोठ्या तणावात गेला होता. घटनेच्या दिवशी गोविंद थेट पूजाच्या घरी गेला आणि तिच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. "पूजाला काहीतरी समजवा, ती माझ्याशी बोलत नाही" अशी त्याने विनंती केली, पण तिच्या आईकडूनही कोणतीही मदत मिळाली नाही.या सर्व अपमान व तणावामुळे खचलेला गोविंद पूजाच्या घराबाहेर गाडीमध्ये बसूनच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.