घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; २८ सिलेंडर जप्त
घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; २८ सिलेंडर जप्त
img
वैष्णवी सांगळे
इराण अमेरिका युद्धामुळे भारतात गॅसचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. कच्या तेलाची निर्यात बंद असल्याने संपूर्ण जगालाच या युद्धाची झळ बसत आहे. गॅसभावी अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर काही हॉटेल्समध्ये अक्षरश चुली पेटवल्या आहे. दरम्यान बीडमधून एक मोठी बातमी समोर अली आहे. बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्सवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करून 

घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची याठिकाणी तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हाभरात तब्बल 19 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी वेगवेगळ्या भागांमध्ये 203 ठिकाणी छापेमारी करत तपासणी केली. या कारवाईदरम्यान 28 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

प्रशासनाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group