सिलेंडरची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ''ही'' चूक पडू शकते महागात !
सिलेंडरची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ''ही'' चूक पडू शकते महागात !
img
दैनिक भ्रमर



भारतात आता एलपीजी सिलेंडरचं वितरण आता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) ने होतंय. गॅस सिलेंडर डिलिव्हरीमधील घोटाळेबाजी रोखण्यासाठी हा कोड आवश्यक केला आहे. आता 100% वितरण याच्या माध्यमातूनच केलं जात आहे. डीएसीचा हेतू सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावेत हा आहे.

मात्र, आता सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी या डीएसीचा शस्त्र म्हणून वापर केलाय. हा धोका पाहता, एचपी गॅस, इंडेन आणि भारत गॅस यांनी ग्राहकांना मूळ डीएसी कसा ओळखावा आणि तो केव्हा शेअर करावा, याविषयी काही सूचना दिल्या आहेत.

दरम्यान , एचपी गॅसने सोशल मीडिया प्लॅटफॉंम 'एक्स'वर लिहिलंय की, 'LPG सपोर्ट एग्जीक्यूटिव्ह बनून कॉल करणारे बनावट लोक, बुकिंग कन्फर्मेशन, केवायसी अपडेट किंवा सिलेंडरच्या वेगाने डिलिव्हरीच्या बहाण्याने तुम्हाला तुमचा 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' शेअर करण्यास सांगू शकतात.

थोड्याशा निष्काळजीपणामुळे शेअर केलेला एक ओटीपी, बनावट डिलिव्हरी, कन्फर्मेशन आणि फायनेंशियल फ्रॉडचं कारण ठरू शकतं. HPCL कधीच कॉलवर तुम्हाला तुमचा ओटीपी मागत नाही. सिलेंडर तुमच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी आपला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड कधीच शेअर करू नका. सिलेंडर नाही तर ओटीपी शेअर करू नका.एचपी गॅसने आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितलंय की, कंपनी ऑफिशियल सेंडर नेम VM-HPGASc-S ने बुकिंग कंफर्म होण्याच्या माहितीसह उपभोक्ताच्या मोबाईल नंबरवर डीएसी पाठवते. हा एक चार अंकांचा ओटीपी असतो.

याचा वापर फक्त सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी होतो.भारत गॅसचा मेसेज JX-BPCLIN-T सेंडर नेमने येतो. कंपनी 6 अंकांचा डीएसी कोड पाठवते. डीएसी कोडच्या मेसेजसह तुम्हाला तुमचं सिलेंडर बुक होण्याची माहिती असते आणि सील आणि वजन चेक करण्याचा सल्ला दिला जातो. कंपनीचा हेल्पलाइन नंबरही लिहिलेला असतो. इंडेनचा डीएसीचा मेसेज VK-INDANE किंवा VM-INDANE सारख्या अधिकृत आयडीवरुन येतो. इंडेनचा डीएसीही सहा अंकांचा असतो.

कंपनीने म्हटलंय की, एचपी गॅसच्या कर्मचारी कधीही फोन कॉल, WhatsApp किंवा एखाद्या संशयित लिंकच्या माध्यमातून तुम्हाला OTP मागत नाहीत. कोणी फोन करुन तुम्हाला तुमचं सिलेंडर बुक होणं किंवा लगेच डिलिव्हरी करुन मिळेल असं सांगून डीएसी मागत असेल तर सावधान व्हाल. तुमचा ओटीपी कधीच शेअर करू नका.गॅस कंपन्यांनी स्पष्ट केलंय की, DAC/OTP एक पर्सनल सुरक्षा कोड आहे. तो कधीच फोनवर कोणाला सांगू नका आणि कोणत्याही ऑनलाइन फॉर्ममध्ये भरू नका. हा कोड फक्त फिजिकल डिलिव्हरीच्या वेळीच वापारासाठी आहे. म्हणजेच तुम्हाला सिलेंडर मिळेल तेव्हाच हाच कोड डिलिव्हरी बॉयला द्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group