१२ मे २०२६
देशातील गॅस सिलेंडर हा विषय चर्चेचा विषय ठरला असून यात अनेक बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, आता घरगुती एलपीजी सिलेंडरवर मिळणाऱ्या सब्सिडीच्या नियमांना आता कठोरपणे लागू केलं जातंय. याचा कोणावर परिणाम होईल पाहूया.नवीन नियमानुसार ज्या लोकांचं उत्पन्न हे 10 लाख रुपयांहून जास्त आहे. त्यांच्यासाठी सब्सिडीचे दरवाजे आता बंद होणार आहोत. पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना एसएमएस पाठवून अलर्ट करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारच्या या निर्णयाचा एकमेव उद्देश म्हणजे, शासकीय मदत निधी केवळ खऱ्या गरजू आणि पात्र व्यक्तींपर्यंतच पोहोचावा हा आहे. संसाधनांचे न्याय्य वितरण आणि व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी या संपूर्ण प्रक्रियेला गती दिली जातेय. एका वृत्तानुसार, सरकारने अपात्र लोकांची ओळख करण्यासाठी एक मजबूत डिजिटल व्हेरिफिकेशन सिस्टम तयार केलीये. आता गॅस कनेक्शनच्या डेटाबेसला थेट पॅन कार्ड आणि इन्कम टॅक्स रिटर्नच्या रेकॉर्डशी जुळवलं जातंय. यासह, कुटुंबाच्या इतर ओळखपत्रांमधील माहितीही जुळवली जातेय. एका सीएने नुकतंच सोशल मीडियावर इंडियन ऑइलकडून आलेल्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केलाय.
या मेसेजमध्ये स्पष्ट केलंय की, उपभोक्ता किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचं एकूण टॅक्सेबल उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल. तर त्यांना सात दिवसांच्या आत आपलं स्टेटस अपडेट करावं लागेल. याचा थेट अर्थ असा आहे की, आता फक्त कनेक्शन धारकांचं उत्पन्न नाही तर पूर्ण कुटुंबाच्या एकूण कमाईवर लक्ष दिलं जाईल.
दरम्यान, या पावलाचा मुख्य फोकस सरकारी खर्च चांगल्या पद्धतीने नियोजन करणं आहे. नियमांच्या कक्षेत न येताही आर्थिक लाभ घेत असलेल्या लोकांचं अनुदान थांबवलं जातयं. या डिजिटल डेटा जुळवणीमुळे उर्वरित निधी हा जास्त गरजू कुटुंबांसाठी वापरण्यात येईल. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, याचा तुमच्या सिलेंडरच्या सप्लायवर परिणाम होणार नाही. तुम्ही बाजारात सुरू असलेल्या किंमतीत तुमचं गॅस सिलेंडर नियमित खरेदी करू शकता.
Copyright ©2026 Bhramar