LPG सिलिंडरच्या किमतीत घट, मुंबई-पुण्यात गॅस सिलिंडरच्या किंमती किती ?
LPG सिलिंडरच्या किमतीत घट, मुंबई-पुण्यात गॅस सिलिंडरच्या किंमती किती ?
img
वैष्णवी सांगळे
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा एकदा कमी केल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली असून घरगुती सिलिंडरच्या किंमती मात्र जैसे थे आहेत.  

गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात येत आहे. एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रूपयांची कपात करण्यात आली आहेत. नोव्हेंबर महिन्यात एलपीजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये पाच रूपये कपात करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये किमतीत १५.५० रूपयांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्याआधी सिलिंडरच्या किमती सातत्याने कमी होत होत्या. 

IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १० रुपयांनी कमी करण्यात आली. आता दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५८०.५० रुपये आहे.  मुंबई आणि पुण्यामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,५३१.५० रुपये इतकी झाली आहे. 

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमतीत कोणताही बदल झाला नाही. घरगुती सिलिंडरची किंमत ८ एप्रिल रोजी शेवटची बदलण्यात आली होती. मुंबईत ८५२.५० रुपये, दिल्लीमध्ये ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये इतकी किंमत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group