दसरा-दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका ; LPG सिलेंडरचे वाढले दर
दसरा-दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका ; LPG सिलेंडरचे वाढले दर
img
Dipali Ghadwaje
सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५ रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दर मंगळवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत.

या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1740 रुपये झाली आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ केली होती. 1 जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती, तर 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी करण्यात आली होती.
 
दरम्यान घरगुती सिलेडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी फक्त 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेडरच्या किमती वाढवल्या आहेत, पण घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना विकला जात आहे, तर कोलकातामध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजीची किंमत 802.5 रुपये आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 918.5 रुपये आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group