ग्राहकांना नववर्षाची भेट ; LPG गॅस झाला
ग्राहकांना नववर्षाची भेट ; LPG गॅस झाला "इतक्या" रुपयांनी स्वस्त
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी आली आहे. सध्या संपूर्ण भारतात कडाक्याची थंडी सुरू झाली असून यावेळी गॅस सिलिंडरची जास्त गरज पडते कारण पिण्यासाठी सतत गरम पाणी लागते. अशा परिस्थितीत ऊर्जेची मागणी वाढली असून कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल PSU ने LPG सिलेंडरच्या किमतीत काहीसा दिलासा दिला मात्र, ही सवलत फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडर म्हणजेच हॉटेलमध्ये वापरात येणाऱ्या सिलिंडरवर देण्यात आली आहे.

व्यावसायिक LPG सिलिंडर स्वस्त झाला

१ जानेवारी २०२५ रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली असून दिल्ली ते मुंबई गॅस सिलिंडरचे दर १४ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत.

मात्र, तेल कंपन्यांनी केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात केली तर , घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही स्थिर आहेत , म्हणजेच त्यात कोणताही बदल झालेला नाही.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर रिफिल करण्यासाठी ग्राहकांना आता १,८०४ रुपये मोजावे लागतील तर, मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १,७५६ रुपयांपर्यंत खाली आली आहे, जी याआधी १,७७१ रुपये होती.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यामुळे सामान्यांना हॉटेल रेस्टॉरंटमधील जेवणाचे बिल खिशाला जड होणार नाही. तसेच ऑनलाईन ऑर्डर करूनही दिलासा मिळू शकतो.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group