महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका ; LPG गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ ; जाणून घ्या नवीन किंमत
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका ; LPG गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ ; जाणून घ्या नवीन किंमत
img
Dipali Ghadwaje
वाढत्या महागाईचा फटका सर्व स्तरांमधल्या नागरिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बसतोच. सामान्य माणसाची तर महागाईमुळे फार बिकट अवस्था होते. अशातच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण आहे. कारण १ तारखेपासून विविध वस्तूंच्या दरांत बदल झाला असून गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.

सरकारी तेल कंपन्या म्हणजेच OMCs यांनी दिलेल्या महितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या दरांत बदल झाला आहे. सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. LPG गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेला बदल व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. त्यामुळे 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 6.5 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. बदल झालेले हे नवे दर आजपासूनच सुरू होत आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी जास्त वापरला जातो. त्यामुळे येथील जेवणाच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी 19 किलोग्रॅमचे सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाले होते याच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. किंमती कमी केल्यानंतर आता पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये घरगुती वापरात असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

सिलिंडरच्या किंमती वाढलेल्या दरांनुसार मेट्रो शहरांमध्ये किंमती पुढील प्रमाणे आहेत.

  • दिल्लीमध्ये 1652.50 रुपये
  • कोलकातामध्ये 1764.50 रुपये
  • मुंबईत 1605 रुपये
  • चेन्नईमध्ये 1817 रुपये 

आता गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत असल्याने पदार्थांच्या किंमती सुद्धा वाढू शकतात अशी शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group