1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; गॅस सिलिंडरपासून बँक खात्यावर परिणाम होणार ; खिशावर येणार ताण ...
1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; गॅस सिलिंडरपासून बँक खात्यावर परिणाम होणार ; खिशावर येणार ताण ...
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : जुलै महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अशातच १ ऑगस्टपासून देशात अनेक मोठे बदल होणार आहेत. घरातील किचनपासून बँक खात्यापर्यंत याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. या नियम बदलाचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एलपीजी सिलिंडरपासून क्रेडिट कार्डच्या नियम बदलांचा यात समावेश आहे.

  • एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 

ऑईल मार्केटिंग कंपन्या महिन्यांच्या पहिल्या तारखेपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करतात. या १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सहा वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे. १९ किलोग्राम असणाऱ्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात अनेक बदल झाले आहेत. आता १४ किलोग्रामच्या घरगुती गॅसच्या किंमतीत आतापर्यंत कोणतेही बदल पाहायला मिळाले नाहीत. दिल्लीत जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मशियल एलपीजी सिलिंडरच्या दरात ३० रुपयांनी घट झाली होती. यंदाही लोकांना या घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी होईल, अशी आशा आहे.


  • सीएनजी आणि पीएनजीचे दर

देशभरातील पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या दरासहित एअर टर्बाईल फ्यूल आणि सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून त्यांचे नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे. 


  • एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड 

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक कार्डधारकांना १ ऑगस्टपासून नवीन अपडेट मिळण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे थर्ड पार्टी अॅप, पेटीएम, फ्री रिचार्ज केल्यावर १ टक्के चार्ज लागू होण्याची शक्यता आहे. तसेच प्रति ट्रांजेक्शनची मर्यादा ३००० रुपये करण्यात आली आहे. फ्यूल ट्रांजेक्शनवर १५००० रुपयांच्या देवाणघेवाणावर कोणताही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही. १५००० रुपयांच्या देवाणघेवाणीवर १ टक्के शुल्क लागू होण्याची शक्यता आहे.

 १३ दिवस बँक सुट्ट्या 

ऑगस्ट महिन्यात बँकांचे काम १३ दिवस बंद राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन , जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन या सारख्या सार्वजनिक सुट्ट्यांचा समावेश आहे. तसेच या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. 

गुगल मॅपचा चार्ज

गुगल मॅपच्या वापरात १ ऑगस्ट २०२४ रोजीपासून नियमात बदल होणार आहे. १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात हा नियम लागू होणार आहे. भारतात गुगल मॅप सर्व्हिसवरील शुल्कात ७० टक्क्यांपर्यत कमी करण्याची घोषणा झाली आहे. गुगल आता मॅपच्या सर्व्हिसचे शुल्क डॉलरच्या ऐवजी भारतीय रुपये देखील स्वीकारणार आहे.


हेही वाचा >>>> व्ही एन नाईक संस्थेच्या निवडणुकीत प्रगती पॅनेलने गड राखला मात्र सिंह गेला

इतर बातम्या
Join Whatsapp Group